मुंबई : छोट्या पडद्यावर प्रत्येक मालिका ही तिच्या कथेनुसार प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी होते. पण 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचं समीकरण जरा वेगळ आहे. या मालिकेला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. सर्वांनाच पोटधरून हसायला भाग पाडणारी ही मालिका आता मराठीत देखील झळकणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फक्त मराठी' या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी’या नावाने प्रदर्शित होणार आहे. नुकताच या मराठी व्हर्जनचा प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय चाहत्यांना हा प्रोमो अधिक आवडल्याचं दिसत आहे. 



२४ डिसेंबरपासून ही मालिका चाहत्यांना पाहता येणार आहे. ‘गोकुलधामची दुनियादारी’ हे मूळ मालिकेचे डब व्हर्जन असणार आहे. मालिकेची कथा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांभोवती फिरता दिसणार आहे. 


'सुरवातीपासूनच प्रेक्षकांसाठी विनोदी शो साकारणं आमचं ध्येय आहे. असे कार्यक्रम की जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून हसायला भाग पाडेल. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी 'तारक मेहता..'ला भरभरून प्रेम दिलं, तसचं ‘गोकुलधामची दुनियादारी’मालिकेला देतील अशी अपेक्षा असित मोदी यांनी व्यक्त केली. 


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका १८ जुलै २००८ रोजी सुरु झाली होती. आता या मालिकेचे २८०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. मालिकेतील मुख्य भूमिकेतील दयाबेन उर्फ दिशा वकानीने शो सोडल्यामुळे मालिकेच्या चर्चा रंगल्या होत्या.