मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमा करायला सुरुवात केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १५३.९४ कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर कमाई वाढता वाढतच आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून हा सिनेमा चांगली कमाई करतोय.


२० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अजय देवगण, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.