मुंबई : बंगालच्या राणाघाट स्टेशनवर लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं 'एक प्यार का नगमा हैं'  या गाण्याने  रातोरात स्टार बनलेली राणू मंडल सध्या भलतीच चर्चेत आली आहे. राणू मंडल 'एक प्यार का नगमा हैं' गाणं गात भलतीच प्रसिद्धी मिळवली राणू मंडलने गायलेलं गाणं ऐकून मोठमोठे सेलिब्रेटी तिला भेटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया सेन्सेशन राणू मंडलचा एक व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये ती वधूच्या वेषात दिसत आहे.  खरंतर हा व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बंगाली वधूच्या वेषात रानू मंडलचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. वधूच्या वेशात दिसलेली रानूला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. व्हायरल होण्याचा नवा मार्ग तिने शोधला आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रानू मंडल लाल साडी आणि दागिन्यांमध्ये बंगाली वधूच्या रूपात दिसत आहे. यासोबत ती व्हायरल बंगाली गाणं 'काच्चा बदाम' गाताना दिसत आहे.


राणू मंडलने पुन्हा कच्च्या बदाम गाणं गायलं
भूवन बडियाकर यांचं गाणं काही दिवसांपूर्वी ऑनलाइन ट्रेंड करत होतं. भूवनचं 'कच्छा बदाम' हे गाणं स्वतःच्या आवाजात गायलं आहे. तुम्ही बघू शकता, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राणू मंडल वधूच्या पेहरावात 'कच्छा बदाम' गाताना दिसत आहे.


राणू मंडलचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे
हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या व्हिडिओने सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.


तीन वर्षांपूर्वी एका गाण्याने रातोरात स्टार झाली
जानेवारी 2022 मध्ये, रानू मंडलच्या कच्छा बदाम गाण्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आला होता. 1972 मधील 'एक प्यार का नगमा है' गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये राणू मंडल रातोरात स्टार बनली. अगदी गायक आणि संगीत दिग्दर्शकाने त्यांच्या 'हॅपी हार्डी अँड हीर' या चित्रपटासाठी तिला संधी दिली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परंतु असं म्हणतात ज्याला भेटत त्याला देव ‘छप्पर फाडके देता है’ त्याच प्रमाणे राणू मंडलला देखील देवाने अनेक परिश्रमानंतर प्रत्येक गोष्ट दिली याशिवाय, रानू सोशल मीडिया सेन्सेशन देखील बनली होती आणि तिची लोकप्रियता फक्त गगनाला भिडली होती.