`प्रेमाला वय नाही,` 31 वर्षीय अभिनेत्री 70 वर्षीय गोविंद नामदेव यांच्या प्रेमात? Instagram वर शेअर केला फोटो
Govind Namdev Shivangi Verma Photo: 31 वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला (Instagram) 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Govind Namdev Shivangi Verma Photo: 31 वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला (Instagram) 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना शिवांगी वर्माने दिलेल्या कॅप्शनमुळे त्यांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'प्रेमाला ना वय माहिती असतं, ना मर्यादा', अशी कॅप्शन तिने दिली आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवांगी वर्माची पोस्ट काही मिनिटातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी दोघांमध्ये अफेअर सुरु असून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचा अंदाज लावला. अनेकांनी त्यावर कमेंटही करण्यास सुरुवात केली. एकाने लिहिलं, यासाठीच पैसा महत्त्वाचा असतो.
दरम्यान अनेकांनी शिवांगी वर्माची ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज लावला. कारण शिवांगी आणि गोविंद नामदेव एका कॉमेडी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यामुळे शिवांगी उत्साहित असून, त्यासाठीच तिने ही पोस्ट शेअर केली असावी असं काहीजण सांगत आहेत. शिवांगीने ही भूमिका आपल्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्वापेक्षा पूर्ण वेगळी असल्याचं म्हटलं आहे.
गोविंद नामदेव यांनी दिलं स्पष्टीकरण
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गोविंद नामदेव यांनी स्पष्टीकरण देत शिवांगी वर्मासह अफेअर असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. हा फोटो आपल्या आगामी चित्रपटाशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या चित्रपटात दोघांमध्ये अफेअर दाखवण्यात आलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा तो फोटो शेअर केला असून हे नातं पूर्पणणे प्रोफेशनल असून आपण आपल्या भूमिकांशी बांधील असल्याचं म्हटलं आहे. आपली पत्नी सुधा नामदेव हिच्याव्यतिरिक्त कोणाशीही प्रेम करु शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हे रिअल लाईफ प्रेम नाही, रील लाईफ आहे जनाब. गौरीशंकर गोहरागंज वाले चित्रपट आहे, ज्याची शुटिंग इंदोरमध्ये सुरु आहे. हा त्याच चित्रपटाचा स्टोरी प्लॉट आहे. यामध्ये एक वयस्कर माणूस तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. मला वैयक्तिकरित्या कोणत्याही जुन्या-नव्या अभिनेत्रीशी प्रेम होणं या जन्मात तरी शक्य नाही".
"माझी सुधा माझा श्वास आहे. सर्व मोहमाया, स्वर्ग सगळं काही माझ्या सुधासमोर फिकं आहे. जर थोडंस इथे तिथे झालं तर देवाशीही लढेन, मग होऊ दे शिक्षा," असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे.
गोविंद नामदेव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहेत. ओह माय गॉड, बँडेड क्वीन, सत्या, सिंघम सारख्या चित्रपटातील अभिनयामुळे ते ओळखले जातात. 'शोला और शबनम' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.