मुंबई : 'गोव्याच्या किनाऱ्याव' फेम सुहृद वार्डेकर आणि सायली संजीव यांचा 'दाह मर्मस्पर्शी कथा' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला, 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दाह मर्मस्पर्शी कथा' या चित्रपटातून नात्यांच्या अनेक बाजू, नात्यांचं महत्त्व अतिशय सुंदररित्या अधोरेखित करण्यात आलं आहे. आपली किंवा परकी असा भेदभाव न करता प्रत्येक नात्यात मायेची, प्रेमाची भावना असते हेच या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.


'दाह मर्मस्पर्शी कथा'चं दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केलंय. तर युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सायली संजीव, सुहृदशिवाय चित्रपटात गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुलेही भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.


'दाह मर्मस्पर्शी कथा' १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


याशिवाय, सायली संजीव 'मन फकीरा' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



'