मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हि़डिओज व्हायरल होत असतात. आता असाच एक लग्नातील व्हिडिओ समोर आला आहे. यात नवरा-नवरी एकमेकांसोबत डान्स करत आहेत. या व्हिडिओत नवरा नवरीला उचलून घेऊन डान्स करताना दिसत आहे. जे पाहुन तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. हा डान्स व्हिडिओला इंटरनेटवर चांगलीच पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ केअर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन दोन महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. या काळात १ कोटी ३० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. तर ७१ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, हे समजलेले नाही.


सपना चौधरीच्या गाण्यावर ठुमके


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओतील ही नवी जोडी हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या लोकप्रिय गाण्यावर तेरी आंख्यां का यो काजलवर थिरकताना दिसत आहेत. भर लग्नात अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित आहेत. या सर्वांसमोर नवरीला उचलून घेत नवऱ्याचा हा डान्स हास्यासपद ठरत आहे.




आणि सपना चौधरी झाली प्रसिद्ध


सपना चौधरीचे हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले आहे. इंटरनेटवर या गाण्यावर डान्स करतानाचे अनेक डान्स व्हिडिओज आहेत. बिग बॉसमधील एंट्रीने सपना चौधरीला अतिशय प्रसिद्ध केले आणि तिच्या चाहत्यांची संख्या जबरदस्त वाढली.