मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे फोटो व्हायरल होत असून त्यांना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जात आहे. चाहतेही हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत आणि आपल्या आवडत्या स्टार्सचे फोटो ओळखण्यासाठी त्यांच्या मेंदूवर भर देत आहेत. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी दिसत आहे. ही गोड मुलगी परीसारखी दिसत आहे. ही गोंडस मुलगी आता बॉलीवूडची एक मोठी स्टार आहे आणि तिची तुलना सर्वात ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही ओळखत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. नुकताच तिने हा फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो जॅकलिनच्या बालपणीचा आहे. हा फोटो एका डॉक्युमेंटसाठी क्लिक करण्यात आला होता. 


थ्रोबॅक फोटोमध्ये, जॅकलिन फर्नांडिस निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पोशाखात मोहक दिसत आहे. इंडस्ट्रीतील लोकं, मित्र आणि चाहत्यांनी तिच्या फोटोवर भरपूर कमेंट केल्या आहेत. प्रीती झिंटाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, 'खूप क्यूट'. तर यामी गौतमने लिहिलं आहे की, "किती सुंदर." तर मनीष पॉलने "प्रिय" आणि उर्वशी रौतेलाने "व्वा" लिहिलं.


जॅकलीन फर्नांडिसने 2009 मध्ये अलादीन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने सलमान खानसोबत 'किक' आणि 'रेस 3' सारख्या अनेक चित्रपटात काम केलं. 'किक' या सिक्वलमध्ये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. जॅकलिन फर्नांडिसने मर्डर 2, रेस 2, हाऊसफुल 2, हाऊसफुल 3, जुडवा 2, ब्रदर्स आणि साहो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.