'अंतर्वस्रं अशी परिधान करा जी...'; विमान कंपनीचा एअर होस्टेसला आदेश! जगभर 'त्या' 2 पानांची चर्चा

Airlines Memo Mention Proper Undergarments: या जगप्रसिद्ध विमान कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या सूचनांची यादी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असं काय काय म्हटलं आहे या सूचनांमध्ये जाणून घेऊयात...

| Sep 20, 2024, 16:24 PM IST
1/12

aeltaairlinesmemo

सध्या या कंपनीने जारी केलेल्या मेमोची केवळ हवाई वाहतूक क्षेत्रात नाही तर जगभरात चर्चा आहे. नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...

2/12

aeltaairlinesmemo

विमान उड्डाणादरम्यान विमानात प्रवाशांच्या सेवेत असलेल्या फ्लाइट अटेंडंड्ससाठी अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सने काढलेला मेमो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र ही चर्चा चुकीच्या कारणांनी आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य - रॉयटर्स आणि instagram/deltaflightattendants वरुन साभार)  

3/12

aeltaairlinesmemo

या कंपनीने नुकताच जारी केलेल्या दोन पानांच्या मेमोमध्ये थेट ग्राहकांना सेवा देणाऱ्या विमानातील फ्लाइट अटेंडंट म्हणजेच एअरहोस्टेस आणि एअर स्टुअर्ट्ससाठी सूचना जारी केल्यात. या सूचना वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

4/12

aeltaairlinesmemo

विमानामध्ये ड्युटीदरम्यान तसेच मुलाखतीमध्ये, प्रशिक्षणादरम्यान आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे प्रेझेंटेबल रहावं याबद्दलच्या सूचना डेल्टा एअरलाइन्सने दिल्या आहेत.  

5/12

aeltaairlinesmemo

या सूचनांच्या यादीमध्ये अगदी केशभूषा कशी असावी इथपासून ते कपडे कसे असावेत याबद्दलही सूचना केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यात अंतर्वस्रांबद्दलचा सल्लाही देण्यात आला आहे.   

6/12

aeltaairlinesmemo

"डेल्टाचे फ्लाइट अटेंडंट्स हे बराचसा वेळ ग्राहकांबरोबर असतात. त्यामुळेच ते एअरलाइन्सचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच डेल्टा कंपनीचं प्रातिनिधित्व करताना त्यांनी ग्राहकांना अधिक उत्तम अनुभव देण्यासाठी कटीबद्ध असलं पाहिजे," असं कंपनीने या मेमोमध्ये म्हटलं आहे.

7/12

aeltaairlinesmemo

"डेल्टा फ्लाइट अटेंडंटने प्रवाशांचं उत्साहाने, काळजीने स्वागत करावं. ग्राहकांना आठवणीत राहतील असा प्रवासाचा अनुभव देणं त्याचं काम आहे. अंगावर युनिफॉर्म चढवल्याच्या क्षणापासून ग्राहकांना सेवा देण्यासंदर्भातील भाव कर्मचाऱ्यांच्या मनात हवा," असं कंपनीने मेमोत म्हटलं आहे.

8/12

aeltaairlinesmemo

"सर्वात आधी सुरक्षेला महत्त्व देण्याबरोबरच डेल्टाची संस्कृतीनुसार आपल्या विनम्र वागण्यामधून ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव देणं हा कामाचा भाग आहे," असं कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.  

9/12

aeltaairlinesmemo

केस नैसर्गिकरित्या कलर केलेले हवेत. केसांना हायलाइट केलेलं नसावं, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. पापण्या नैसर्गिक पद्धतीच्याच असाव्यात, असंही सांगण्यात आलं आहे.  

10/12

aeltaairlinesmemo

नखं साधी असावीत. बहुरंगी, चमकणारी किंवा हाताने काढलेली डिझाइन नखांवर नसावी. अंगावरील टॅट्यू इतरांना दिसता कामा नये, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. कंपनीने अगदी कर्मचाऱ्यांच्या अंतर्वस्रांचाही उल्लेख केल्याने या मेमोवर काहींनी टीका केली असून या मेमोची जगभरात चर्चा आहे. अंतर्वस्रांबद्दल मेमोमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात...  

11/12

aeltaairlinesmemo

'डेली मेल'ने या मेमोमधील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या बातमीनुसार, या सूचनांच्या यादीत एअरहोस्टेस आणि एअर स्टुअर्ट्सला अंतर्वस्र परिधान करताना ती इतरांना दिसणार नाहीत अशापद्धतीने परिधान करावीत असं म्हटलं आहे. 'proper undergarments' या मथळ्याखाली ही सूचना करण्यात आली आहे. म्हणजेच 'अंतर्वस्र अशी परिधान जी इतरांना दिसता कामा नयेत', असं कंपनीचं म्हणणं आहे.  

12/12

aeltaairlinesmemo

नाकामध्ये केवळ एकच नोज पिअर्सिंग केलेलं असावं. त्यातही सोनं, चांदी किंवा पांढऱ्या रंगाची अथवा हिऱ्यासारख्या खड्याचं नाकातलं वापरावं. ड्रेस आणि स्कर्ट गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या खालीपर्यंत असावा. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य - रॉयटर्स आणि instagram/deltaflightattendants वरुन साभार)