Guess Who : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात. या व्हायरल फोटोत काही फोटो हे तुमच्या आवडत्या कलाकारांचे असतात. हे कलाकार लहाणपणी कसे दिसतात? त्यांचे शिक्षण कुठून झाले आहे? त्यांचे आवडते ठिकाण कोणते आहे? अशा सर्व गोष्टी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल जाणून घ्यायच्या असतात. असाच एक प्रसिद्ध अभिनेत्रीचा (Actress) फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : 'गंदी बात' फेम Anveshi Jain चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 'तो' VIDEO आला समोर 


सोशल मीडियावर दररोज कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात.आता असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दोन लहान मुल बेडवर झोपली आहे. या फोटोत एक चिमुकली मुलगी आहे. ही चिमुकली मुलगी आता मोठी होऊन बॉलिवूडवर राज्य करतेय. या चिमुकलीला तुम्हाला ओळखायचं आहे. 


फोटोत काय? 


फोटोत (Photo Viral) एक बेड दिसत आहे. या बेडवर दोन लहान मुल झोपली आहेत. फोटोमध्ये मुलगा कॅमेराकडे पाहत आहे, तर मुलगी दोन्ही गालावर हात ठेवून खूप कंटाळलेली दिसत आहे. यामधील चिमुकली ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचा पहिलाच चित्रपट खुप गाजला होता. तसेच ती बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी आहे. तिच्या वडिलांनी देखील बॉलिवूडचा एक काळ गाजला होता.  



दरम्यान तिच्याबाबत तुम्हाला इतकी माहिती देऊन सुद्धा अजूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आहे. तिचे वडिल देखील प्रसिद्ध दिग्गज अभिनेते आहेत, त्यांचे नाव शक्ती कपूर आहे.  तिने आशिकी 2, बाघी, साहो, एक विलन सह अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.