Guess the celebrity: आपण सर्वजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना सोशल मीडियावर कायम फॉलो करतो. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे, ते कुठे जातात, काय खातात, कुणाला डेट करतात त्यांच्याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकाला सवय असते. अशात आपले फेव्हरेट सेलेब्रिटी लहानपणी कसे दिसायचे याबाबतही आपल्याला प्रचंड आकर्षण असतं(attraction about favourite celebrity). असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे (Celebrities and social media). या फोटोतील हा मुलगा सध्याच्या सेलिब्रिटी किड्सच्या तोडीस तोड पाहायला मिळतो (Celebrity Kids).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सेलिब्रिटी किड्समध्ये तैमूर खान (Taimur Khan) आणि जेह प्रचंड भाव खाऊन जाताना पाहायला मिळतात. अशात व्हायरल होणार फोटो हा अशा एका बड्या सेलिब्रिटींचा आहे ज्याचे ज्याच्या सिनेमांना तुम्ही प्रचंड प्रेम दिलं आहे, सोबत स्वतः हा कलाकार अनेक वाद विवादात अडकलेला देखील पाहायला मिळालाय. चला तर मग तुम्हाला हा सुपरस्टार (guess this superstar) ओळखता येतोय का हे पाहा. 


या फोटोमधील अभिनेत्याने अनेक सुपरस्टार सिनेमे केले आहेत. या अभिनेत्याला आपल्या स्टोरी सिलेक्शनसाठी कायम ओळखलं जातं. नुकताच या अभिनेत्याचा एका इंग्रजी सिनेमाच्या धर्तीवर लाल सिंग चढ्ढा (aamir khan and Lal Singh Chaddha Cinema ) नावाचा सिनेमाही आलाय. 


कोण आहे हा अभिनेता ?


वरील फोटोमध्ये दिसणारा अभिनेता आहे आमिर खान (Amir Khan). आमिर खान याचा लाल सिंग चढ्ढा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमादरम्यान आमिरबाबत मोठ्या प्रमाणात बातम्या समोर येत होत्या. आमिर खानवर या सिनेमादरम्यान अनेकांनी विविध मते देखील मांडली. 


आमिरसोबत आहे तरी कोण? 


या फोटोत आमिर खान (Aamir Khan Controversy)   आपल्या कुटुंबाच्या किती जवळ आहे हे पाहायला मिळतं. आमिर खानचं इन्स्टापेज त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या फोटोंनी भरलेलं पाहायला मिळतं. या फोटोत आमिर खान आपल्या विडीलांसोबत म्हणजेच ताहीर हुसेन यांच्यासोबत पाहायला मिळतोय. आमिर खान यांचे वडील निर्माते, दिग्दर्शक आणि एक अभिनेता देखील होते. आमिर खानकडे कलेचा वसा आपल्या वडिलांकडून आला आहे.  


आमिर खानबाबतची मोठी कॉन्ट्रोव्हर्सी  


आमिर खान याच्या सिनेमांना आपण प्रचंड प्रेम दिलं आहे. मात्र आमिर आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि त्याच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत राहिलाय. आमिर खान टर्की मध्ये गेला होता तिथं त्याने एमीन एर्दोगन यांची भेट घेतलेली. यानंतर आमिर खानला प्रचंड ट्रोल करण्यात आलेलं. PK सिनेमावरूनही आमिर खान प्रचंड ट्रोल झाला होता.