मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा हा बालपणीचा फोटो आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखता येतोय का पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : 'गंदी बात' फेम Anveshi Jain चा बोल्ड VIDEO आला समोर


फोटोत काय? 


हा फोटो सिनेमातला आहे. यामध्ये दोन कलाकार दिसत आहे. एक चाईल्ड आर्टीस्ट (Child Artist) आहे,तर दुसरी महिला दिग्गज कलाकार आहे. या फोटोतल्या चाईल्ड आर्टीस्टला (Child Artist) तुम्हाला ओळखायच आहे. हा चाईल्ड आर्टीस्ट आता बॉलिवूडचा सुपरस्टार (Bollywood Superstar) बनला आहे. त्याने बॉलिवूडला (Bollywood) अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच तो बॉलिवूडमध्ये मिस्टप पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.


हे ही वाचा : Ajay Devgn च्या लेकीचा मित्रांसोबत जबरदस्त डान्स,पार्टीचा VIDEO आला समोर 


कोण आहे हा अभिनेता? 


व्हायरल फोटोमध्ये दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) आहे. फोटोमध्ये छोटा आमिर अतिशय निरागसपणे हसताना दिसत आहे. त्याची एक नाही तर दोन-तीन फोटो समोर आली आहेत. पण कोणत्याही फोटोत आमिरला ओळखणे कठीण होत आहे.कालांतराने फोटोत निरागस दिसणारा छोटा आमिर (Amir Khan) आज बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार आहे. त्याच्या नावानेच चित्रपट चालतात. आमिर खान (Amir Khan) चित्रपटात असेल तर तो चित्रपट सुपरहिट ठरतो असे देखील बोलले जातेय.


दरम्यान बॉलिवूडमध्ये आमिरने (Amir Khan) अनेक हिट चित्रपट दिले आहेत.या हिट चित्रपटाचे प्रेक्षक देखील दिवाने आहे. काही महिन्यापुर्वीच त्याचा  लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा आला होता. हा सिनेमा अक्षरश आपटला होता. या चित्रपटानंतर तो सिनेमातून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे.