मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला
(Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती तिच्या आईसोबत बसली आहे. तिने मातृदिनानिमित्त हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोतली चिमुकली आता खुप मोठी झाली असून बॉलिवूडची अभिनेत्री बनली आहे. 


फोटोतली मुलगी आता मोठी झाली असून बॉलिवूडच्या (Bollywood Actress) अनेक अभिनेत्यांसोबत सिनेमात झळकली आहे. शाहरूख खान, सलमान खान यासह गोविंदा सारख्या अभिनेत्यासोबत सिनेमात झळकून तिने मोठा पडदा गाजवला आहे. अजूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही अभिनेत्री करीश्मा कपूर (Karishma Kapoor) आहे.  


कोण आहे ही अभिनेत्री?


 अलीकडेच करिश्मा कपूरने तिच्या आईसोबतचा तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करिश्माचे (Karishma Kapoor) पुढचे दात तुटलेले आहेत. त्याच वेळी, करिश्मा कपूर दोन वेण्यांमध्ये खूप गोंडस दिसत आहे.


करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात प्रेम कैदी या चित्रपटातून केली होती. यानंतर करिश्माने एकाहून एक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.त्यापैकी एक म्हणजे करिश्मा कपूरची बीवी नंबर वन, या चित्रपटात करिष्मासोबत सलमान खान झळकला होता.


दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करिश्मा (Karishma Kapoor) ओटीटीमध्ये पदार्पण करू शकते. याशिवाय ती ऑनलाइन मार्केटमधून भरपूर पैसे कमावते आहे. तिच्या ओटीटी पदार्पणाची चाहत्यांना उत्सुकता आहे.