मुंबई : पतौडी कुटुंबाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे जुने फोटो लोकांना पाहायला फार आवडतात. तसाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सबा पतौडी तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जुने फोटो कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीही सबाने एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. मात्र यावेळी तिने चाहत्यांना चॅलेंज दिलं आहे. फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्याला ओळखण्याचं चॅलेंज यावेळी साबाने चाहत्यांना दिलं आहे  फोटो शेअर करत  तिने Guess Who? असं लिहीलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या फोटोतील या मुलाला ओळखणं चाहत्यांसाठी थोडं कठीण झालं आहे. आजवर आपण जो खेळ खेळत आलो, तो खेळ सबानेही खेळायला सुरुवात केली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्याचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं , जान! या फोटोला कॅप्शन द्या! आणि फोटोत दिसणारा हा चिमुकला कोण आहे याचा अंदाज लावा.... तसंच या कॅप्शनमध्ये तिने ''त्या लाल बांगड्या दे आई!'' असं देखील लिहीलं आहे.


आता चाहते हा फोटो बघून हे छोटं बाळ कोण आहे याचा अंदाज लावत आहेत. काहीजण या मुलाला तैमूर अली खान म्हणत आहेत, तर काहीजण या मुलाला इब्राहिम म्हणत आहे. मात्र आता तुमचा गोंधळ जास्त न वाढवता,  हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून इब्राहिम अली खान आहे.



होय, लहानपणी इब्राहिमचा चेहरा गोंडस तैमूरसारखाच होता. या दोन भावांचे बालपणीचे फोटो एकत्र ठेवले तर त्यांना ओळखणे कठिण होईल. इब्राहिमचा हा बालपणीचा फोटो  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सबाने इब्राहिमच्या चाहत्यांना एक सुंदर भेट देऊन त्यांचा आनंद वाढवला आहे.