20वर्षानंतर त्याच स्विमसूटमध्ये, त्याच जागेवर पोहचली होती गुल पनाग
अभिनेत्री गुल पनाग चे सध्या सोशल मिडियावर थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहे.
मुंबई : अभिनेत्री गुल पनाग चे सध्या सोशल मिडियावर थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहे. तिचे हे फोटो २०१९मधील आहेत जेव्हा ती आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत होती. या फोटोंत गुल पनाग मालदीवमध्ये आपल्या मुलाबरोबर मस्ती करताना दिसत आहे. गुलने आपल्या इन्स्टाग्रामवर यावेळचे बीचवरील काही फोटो शेअर केले होते, ज्यात तिने काळ्या रंगाचा स्विमसूट परिधान केला आहे.
गुल पनागची हे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. गुलने आपला 20 वर्ष जुना फोटो आणि सध्याच्या फोटो या दोन फोटोंना एकत्र करुन शेअर केला आहे. हा फोटो, आपण पाहू शकतो की, गुलने 1999 मध्ये मालदीवमध्ये सुट्टी घालवताना तोच स्विमींग सूट घातला होता. आणि यानंतर ही २० वर्षांनंतर तोच स्विमिंग सूट घातला होता
तिचा हा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. या फोटोनंतर तिचे चाहते तिला फिटनेस फंडा विचारत होते. 20 वर्षांपूर्वीच्या फोटोत ती जशीच्या तशी दिसत आहे. या स्विमूट सूटमध्ये गुल खूपच हॉट दिसत आहे.
गुलच्या मालदीवच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.
गुल 'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमध्ये दिसली. या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय ती 'बायपास रोड' मध्ये देखील दिसली होती.