मुंबई : रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'गली बॉय' चित्रपटाची ९२ व्या अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. झोया अख्तरने 'गली बॉय'चं दिग्दर्शन केलं होतं. तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेस्ट फॉरेन लँग्वेज' या विभागात प्रवेशिका रुपात चित्रपटाची निवड करण्यात आल्याचं कळत आहे. 


ऑस्कर नामांकनांसाठीची अंतिम यादी १३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर ऑस्करचा दिमाखदार पुरस्कार सोहळा ९ फेब्रुवारी २०२० मध्ये पार पडणार आहे.
 
ऑस्करसाठी 'गली बॉय'ची भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांकडून अतिशय आनंद व्यक्त करण्यात येतोय, तर काहींचं 'गली बॉय'पेक्षा दुसऱ्या चित्रपटाचं नाव ऑस्करसाठी पाठवायला हवं होतं असं म्हणणं आहे. त्यामुळे 'गली बॉय'च्या निवडीनंतर ट्विटरवर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.








१४ फेब्रुवारी २०१९ रोजी 'गली बॉय' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने १६५ कोटींची कमाई केली. अनेक चित्रपट समिक्षकांकडून 'गली बॉय'ला चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. 


देशात जवळपास ३३५० स्क्रिनवर 'गली बॉय' प्रदर्शित झाला. चित्रपटात झोया अख्तरने, एका सामान्य मुलाची रॅपस्टार होण्याची कथा, रॅप प्रकारातील क्षेत्रात कशा प्रकारे मुंबईच्या गल्लीबोळातील मुलं पुढे येऊन आपलं वेगळेपण सिद्ध करतात हे सादर केलं होतं.