मुंबई:'सिंबा'च्या अभूतपू्र्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंगचा पुढचा सिनेमा 'गली बॉय' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गली बॉय' सिनेमाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले. ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत.  सिनेमात स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावताना रणवीर दिसणार आहे.   मुस्लिम मुलीची भूमिका आलिया भट्ट बजावत आहे.तिच्या अशा कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



स्ट्रिट रॅपर डिवाईन आणि नैजी  यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारलेला हा सिनेमा आहे. या नव्या गाण्यात रणवीर रॅपर  डिवाईन  आणि नैजीसोबत रॅप करताना दिसतोय. स्वतः रॅपर डिवाईन व नैजी यांनी या गाण्यावर विशेष मेहनत घेतली आहे. त्यांनी हे गाणे गायले आहे. ‘गली बॉय’ हा सिनेमा  मुख्यत: याच दोघांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे. अभिनेता रणवीर सिंग नावेद शेख पात्र साकारताना दिसणार आहे. 


अभिनेता रणवीर सिंगने सिनेमासाठी रॅपर डिवाईन व नैजी यांच्याकडून घेतले. तब्बल दहा महिने रणवीरने सिनेमासाठी प्रचंड मेहत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले असून निर्माती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. कलकी कोचलिन सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.14 फेब्रुवारीला 'गली बॉय' प्रदर्शित होणार आहे. आता रणवीरच्या सिंबा नंतर 'गली बॉय' चाहत्यांच्या पसंतीस उतरणार की नाही पाहणे मजेशीर असणार आहे.