मुंबई : गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षी देखील बॉलिवूडकरांना अनेक मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. गेल्या दोन वर्षात बॉलिवूडने अनेक कलावंत कलाकार गमावले आहेत. आता देखील एका प्रसिद्ध रॅपरने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. 'गली बॉय' सिनेमातील रॅपर एमसी तोडफोड (MC TodFod) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धर्मेश परमारचं निधन झालं आहे. धर्मेशच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेशचं निधन कार अपघातात झालं असल्याचं सांगितलं जात आहे. पण कुटुंबाने धर्मेशच्या निधनाचं कारण अद्याप सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं निधन कार अपघातात झालं, यावर प्रश्नचिन्ह आहे. 



धर्मेशच्या निधनावर शोक व्यक्त करत अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून  रॅपर एमसी तोडफोडला श्रद्धांजली वाहिली आहे. 


रणवीरने इन्स्टा स्टोरीमध्ये धर्मेशचा फोटो पोस्ट केला आहे. तर सिद्धांतने धर्मेशचा फोटो शेअर करत आरआयपी भाई... असं लिहिलं आहे. धर्मेशचं निधन अवघ्या 24 व्या वर्षी झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.