मुंबई : बॉलिवूडसोबतच संपूर्ण जगावर राज्य करणारा सिनेमा म्हणून "बाहुबली" कडे पाहिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातील राणा दग्गुबती याने 2017 च्या शेवटच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. त्याने आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली असून या सिनेमांत तो हत्ती सोबत दिसणार आहे. राणाने या सिनेमाच्या घोषणेसोबतच आपला फर्स्ट लूक देखील रिलिज केला आहे. 



हा सिनेमा यंदा दिवाळीच्या दिवशी रिलिज होणार आहे. हा सिनेमा प्रभू सोलोमन यांनी दिग्दर्शित केला आहे. हाथी मेरे साथी या सिनेमांत बनदेव नावाचं कॅरेक्टर राणा साकारत आहे. राणाद्वारे शेअर केलेल्या या फर्स्ट लूकमध्ये राणा हत्तीच्या मसोर उभा असून त्या हत्तीला वाचवत असल्याचं दिसत आहे. 


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे ट्विट करत या सिनेमाची माहिती दिली आहे. हा सिनेमा हिंदी, तेलगु आणि तामिळ भाषेत रिलिज करणार आहे. हा सिनेमा राजेश खन्ना यांचा रिमेक नसून सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. एवढंच नाही तर दिग्दर्शक प्रभू हे या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.