मुंबई : सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना हनुमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे हनुमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालत आहे. तेज सज्जा फेम अभिनेत्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hanuman Box Office Collection Day 9
या सिनेमाने गुरुवारी केवळ तेलुगू वर्जनने 4 करोड 15 लाख रुपयांचा गल्ला जमावला होता. हा सिनेमा तेलुगूशिवाय हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्ल्याळम भाषेत रिलीज झाला आहे. शुक्रवारी या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा डबल झाल्याचं पाहायला मिळालं. या दिवशी या सिनेमाने 8 करोड 5 लाख रुपये कमावले. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा ग्राफ 54 टक्क्यांनी वाढला, आणि हनुमान सिनमाने 12 कोटी 45 ​​लाख रुपये कमावले. पहिल्या रविवारी चित्रपटाने 16 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता या सिनेमाच्या नवव्या दिवशी देखील बक्कळ कमाई केली आहे.


हनुमान: 9 व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
सिनेमाच्या कमाईचे आकडे जारी करत  Sacnilk ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, या शनिवारी या सिनेमाने 11 करोड 51 लाखचा गल्ला जमवला आहे आणि याच आकड्यांसोबत चित्रपटाचे आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 111 कोटी 36 लाख रुपये झालं आहे. सिनेमाला सगळ्यात तगडा रिस्पॉन्स तेलुगू वर्जनमधून मिळालं आहे. याचबरोबर या सिनेमाचं दुसरं तगडं कलेक्शन हिंदी वर्जन करत आहे.


नजर टाकूया या सिनेमाच्या कलेक्शनवर
Day 0 (गरुवार) - ₹ 4.15 Cr
Day 1 (पहिला शुक्रवार ) - 8.05 Cr
Day 2 (पहिला शनिवार ) -  12.45 Cr
Day 3 (पहिला रविवार ) -  16 Cr
Day 4 (पहिला सोमवार ) -  15.2 Cr
Day 5 (पहिलाt मंगळवार ) -  13.11 Cr
Day 6 (पहिला बुधवार ) -  11.34 Cr
Day 7 (पहिला गुरुवार ) -   9.5 Cr
Day 8 (दुसरा शुक्रवार ) -  10.05 Cr
Day 9 (दुसरा शनिवार )  -  11.51 Cr 
एकूण कलेक्शन    111.36 Cr