मुंबई : बच्चन फॅमिली हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली कुटुंबांपैकी एक आहे. ज्यांचा चित्रपटसृष्टीवर प्रभाव आहे. बच्चन कुटुंबाचं चित्रपटसृष्टीत खूप नाव आहे. याशिवाय, या कुटुंबाची गणना इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये केली जाते. पण एक काळ असा होता जेव्हा बच्चन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती.  मात्र तरीही आज बच्चन कुटुंबाचे नाव बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये घेतले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन गेल्या 4 दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत, तर त्यांची सून आणि मुलगा म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे देखील बऱ्यापैकी सक्रिय आहेत. बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यामुळे साहजिकच या कुटुंबाकडे अफाट संपत्ती आहे. पण या चौघांमध्ये सगळ्यात जास्त श्रिमंत कोण आहे माहिती आहे का? अमिताभ बच्चन  11 ऑक्टोबर रोजी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आज त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  


अमिताभ बच्चन दर महिन्याला 5 कोटींहून अधिक कमाई करत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 60 कोटी रुपये आहे. आतापर्यंत मेगास्टारची एकूण संपत्ती 3390 कोटी रुपये आहे.  अमिताभ बच्चन हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. हा अभिनेता पुढे ब्रह्मास्त्र भाग २ आणि ३ मध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर कल्की 2989AD चा देखील ते एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सीझन 15 होस्ट करत आहेत.


ऐश्वर्या राय बच्चन
बिग बी नंतर, त्यांची सून आणि बॉलिवूड दिवा ऐश्वर्या तिच्या कमाईचा आकडा सर्वाधिक आहे आणि तिची एकूण संपत्ती 823 कोटी रुपये आहे. अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते  तिची वार्षिक कमाई वार्षिक 50 कोटी आहे.


जया बच्चन
दिग्गज अभिनेत्रीने जया बच्चन शेवट  रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दिसल्या होत्या. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सगळीकडून खूप कौतुकही झालं होत. त्यांची एकूण संपत्ती 640 कोटी रुपये आहे.


अभिषेक बच्चन
अभिनेता अभिषेक बच्चन हळूहळू आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहे. अभिनेता वार्षिक 24 कोटी रुपये कमावतो आणि मासिक 2 कोटी कमावतो.. बच्चन कुटुंब हे इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय आणि आदरणीय कुटुंबांपैकी एक आहे आणि तेते अनेकदा सूरज बडजात्याच्या 'हम साथ साथ है' चित्रपटाला महत्त्व देतात.