मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वर्चस्व निर्माण करणारा 'थ्री इडीयट्स' फेम राजूचा आज वाढदिवस आहे. अभिनेता शरमन जोशीने आज ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. 'थ्री इडीयट्स' सिनेमाच्या माध्यमातून शरमनला विशेष लोकप्रियता मिळाली. २००० साली शरमन विवाह बंधणात अडकला. अभिनेता प्रेम चोप्राची मुलगी प्रेरणा सोबत त्याने लग्न केले. गुजराती शरमन जोशी आणि पंजाबी प्रेरणा यांच्या लग्नाला नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शरमनने त्याच्या नात्याचा खुलासा करत सांगितले. या प्रेमी युगुलाने कधीही एकमेकांना प्रपोज केला नाही. त्यांच्यातील प्रेमाचे नाते आपसूकच बहरत गेले. ते एकमेकांसाठी मेड फॉर इच ऑदर असल्याचे समजले होते. ते दोघे एक वर्ष एकमेकांना डेट करत होते. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १५ जून २००० साली ते विवाह बंधनात अडकले. शरमन आणि प्रेरणाला तीन आपत्य आहेत. ख्याना आणि दोन जुडवा मुले वारयान आणि विहान आहेत.


बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीने १९९९ साली 'गॉडमदर' सिनेमाच्या माध्यमातून आपले डेब्यू केले. शरमन जोशीने '3 इडियट्स', 'रंग दे बसंती', 'गोलमाल', 'लाइफ इन अ मेट्रो', 'फरारी की सवारी' या सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे.