मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या फिल्म इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहेत. जया यांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रापर्यंत आपलं सामर्थ्य दाखविलं आहे. त्यांच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या जया बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ९ एप्रिल 1948रोजी झाला. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 1963 मध्ये त्यांनी दिग्दर्शक सत्यजीत रे यांचा बंगाली सिनेमा 'महानगर' मधून डेब्यू केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी जया अवघ्या 15 वर्षांची होत्या. जया बच्चन यांचा पहिला हिंदी चित्रपट हृषिकेश मुखर्जींचा 'गुड्डी' हा होता जो 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट ठरला आणि जया बच्चन यांना मागे वळून पाहायची कधी गरच भासली नाही.


जया यांच्या विवाहित जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तिची आणि अमिताभ बच्चन यांची जोडी बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. जया आणि अमिताभ यांनी बर्‍याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्न खूप रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...


'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट झाली. सेटवर जयाला पाहून अमिताभ खूश झाले. पहिल्याच नजरेत ते जया यांच्या प्रेमात पडले. पण जया यांना अमिताभ अजिबात आवडत नव्हते. त्यावेळी बिग बी जया यांना सेटवर गुपचुप पहायला जायचे.


जयाला त्यांची ही गोष्ट बिलकुल आवडली नाही आणि जयाने त्याबद्दल दिग्दर्शकाकडे बिग बींची तक्रार केली. नंतर दोघे मित्र झाले. त्याचवेळी या दोघांनाही ते प्रेमात कधी पडले हे कळालच नाही. यानंतर दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं.



लंडनला जायच्या कारणाने दुसऱ्याच दिवशी केलं होतं लग्न
एका वृत्तानुसार, 'जंजीर' चित्रपटात जया आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत होते. सिनेमाच्या संपूर्ण टीमने ठरवलं होतं की, हा सिनेमा यशस्वी झाला तर आपण लंडनच्या सुट्टीवर जायचं फिरायला.


जेव्हा बिग बीं या लंडन ट्रिपबद्दल आपल्या वडिलांना विचारलं तेव्हा त्यांनी बीग बींना विचारले की, तुझ्याबरोबर आणखी कोण जात आहे. या ट्रिपमध्ये जयाचे नाव ऐकल्यावर ते म्हणाले की, मी तुला जयासोबत लग्नाआधी कुठेच जावू देणार नाही. यावर बिग बी म्हणाले, "ठीक आहे, आम्ही उद्याच लग्न करतो." मग काय दुसर्‍याच या दोघांचं लग्न पार पडलं आणि लग्नानंतर दोघेही लंडनला फिरायला गेले.