मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा आज 38 वा वाढदिवस. करीनाची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हा त्यांनी अन्ना करेनीना नामक पुस्तक वाचत होती. त्यावरूनच करीनाचं नाव ठेवण्यात आलं. मात्र घरात तिला सर्वजण बेबो म्हणून बोलवत होते. करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 मध्ये मुंबईच झाला. 


पहिल्याच सिनेमात मिळाला अवॉर्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीचं स्वप्न असतं की तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळो. यासाठी प्रत्येक कलाकार वर्षानूवर्षे वाट बघत असतो. पण बेबो मात्र स्पेशल आहे तिला 2000 मध्ये रिफ्युजी करता तिला बेस्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 



एक अशी व्यक्ती ज्याने पू ला वळूण पाहिलं नाही 


आपल्याला बॉलिवूडमधील अनेक डायलॉग पाठ असतात जे जास्त करून अभिनेत्यांच्या तोंडी असतात. मात्र करीना कपूरचा 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील एक डायलॉग जो चाहत्यांच्या लक्षात देखील आहे आणि तो आवडतो देखील. तो डायलॉग म्हणजे 'कौन है जिसने पू को मुड़कर नहीं देखा'... तर जब वी मेट या सिनेमातील डायलॉग तर लोकांनी अगदी श्लोक सारखा पाठ केला आहे. तो म्हणजे  'मैं खुद की फेवरेट हूं'.


सैफच्या टॅटूमुळे एकच गोंधळ 


ज्यावेळी नवाब साहब सैफ अली खान करीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता तेव्हा तो हे प्रेम लपवू शकला नाही. सैफने आपल्या हातावर सैफ आणि करीना असं सैफीना नावाचा टॅटू म्हणून काढला. हा टॅटू इतका लोकप्रिय झाला की प्रत्येक कपल्सने हे नाव आपल्या हातावर गोंदवलं. 



लग्नाच्यावेळी झाला होता विरोध 


करीना कपूरवरून करीना कपूर खान होणं काही सहज नव्हतं. या जोडीने अनेक चाहत्यांचं मन जिंकल आणि अनेकांची मन नाराज केली. करीनाने आपल्यापेक्षा खूप वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफसोबत लग्न केलं. तसेच वेगवेगळ्या धर्मामुळे हा विषय आणखी चिघळला. 


वीरे दी वेडिंग सिनेमात मिळालं यश 


करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर ''वीरे दी वेडिंग'' मधून वापसी केली. 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाधून करीनाने स्पष्ट केलं की तर अजून सिल्वर स्क्रीनवर भारी आहे. 4 अभिनेत्रींनी मिळून बॉक्स ऑफिसवर धम्माल केली.