मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या खलनायकाच्या भूमिकांनी रूपेरी पडद्यावर गाजलेले अभिनेते प्रेम चोप्रा यांचा आज ८४वा वाढदिवस आहे. 'शराफत और ईमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उन्हें देती है जिनके पास दौलत होती है.' असे त्यांचे अनेक गाजलेले डायगॉल आजही प्रसिद्ध आहेत. सिनेविश्वात कायम खलनायकाच्या भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करण्यात ते अग्रेसर होते. 'प्रेम नाम हैं मेरा... प्रेम चोप्रा' त्यांचा हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी बॉलिवूडमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं. त्यांच्या अभिनयाच्या सुरूवात मुंबईत झाली. डोळ्यांमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असलेल्या प्रेम यांच्याकडे सुरवातीला पैसे सुद्धा नव्हते. सतत स्टुडिओ आणि प्रॉडकक्शनच्या फेऱ्या मारल्यानंतरही  त्यांच्या हाती कायम निराशाच लागत होती. 


स्वप्नांच्या नगरीत टिकाव लागण्यासाठी त्यांनी नोकरीकरता 'टाईम्स ऑफ इंडिया'चं ऑफिस गाठलं. तेव्हा त्यांना त्याठिकाणी वितरण विभागात नोकरी मिळाली. त्यांना बंगाल, ओडिशा, बिहार याठिकाणी वृत्तपत्र वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली. नोकरीमुळे त्यांना शहर सोडून देखील जावे लागत असे. त्यामुळे ऑडिशनसाठी जाणे त्यांच्यासाठी कठीण होतं. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. 


मनात इच्छा असेल तर सर्व काही चांगलं होतं असं म्हणतात. प्रेमयांच्या सोबत देखील असाचं अनोखा चमत्कार घडला. रेल्वेमधून प्रवास करताना त्यांची भेट एका अनोळख्या व्यक्ती सोबत झाली. ती भेट त्यांच्यासाठी 'ग्रेट भेट' ठरली. त्या इसमाने तुम्ही चित्रपटात काम करणार का ? असा प्रश्न विचारला. 


त्या एका प्रश्नानंतर त्यांच्या स्वप्नांचा टाळा उघडला. त्या व्यक्ती सोबत ते 'रंजीत' स्टुडिओमध्ये पोहचले. त्यानंतर त्यांची भेट जगजीत सेठी यांच्या सोबत झाली. 'चौधरी करनैल सिंह' चित्रपटात त्यांची वर्णी लागली. या चित्रपटासाठी त्यांना २ हजार ५०० रूपयांचे मानधन मिळाले होते. त्यानंतर त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.