मुंबई : ९० च्या दशकात सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगावर छाप पडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. अभिनय आणि आपल्या नृत्यकौशल्याने तिने त्याकाळात चाहत्यांना आपलेसे करून घेतलेच पण आजही तिच्या चाहत्यांच्या संख्येत घट मात्र झालेली नाही. तिने  सौंदर्य आणि  मनमोहक हास्यामुळे अनेकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. धकधक गर्ल, डान्सिंग क्विन अशा एक ना अनेक नावांमुळे ती जगप्रसिद्ध आहे. तिच्या नावाचा बोलबाला आजही सातासमुद्रा पार आहे. अशा अभिनेत्रीचा आज ५३ वा वाढदिवस. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक दोन तीन', 'मैं कोल्हापुर से आई हूँ', 'दीदी तेरा देवर दिवाना' अशा अनेक गाण्यांवर तिने कमालीचा ठेका धरला, पण 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेड़े मोहे..' या गाण्यावरील तिच्या नृत्याने सर्वांना अश्चर्य करून सोडले. आजही हे गाणं आपण अनेक कार्यक्रमांमध्ये पाहतो. तेव्हा या धकधक गर्लची आठवण आल्या शिवाय राहत नाही. 


'काहे छेड़े मोहे..' या गाण्यात माधुरीने चक्क ३० किलोचा लेहंगा घातला होता. शिवाय या लेहंग्याची किंमत २० लाख होती. 'देवदास' या चित्रपटात माधुरी शिवाय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता मुख्य भूमिकेत झळकले होते. 



त्याचप्रमाणे, ९० च्या दशकात माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती. अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.


माधुरी दीक्षितला आतापर्यंत पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय भारतीय चित्रपटांच्या योगदानाबद्दल २००८ मध्ये तिला नागरिक सम्मान पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. माधुरी दीक्षितने तिच्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. लग्नानंतर तिने `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या चित्रपटातून कमबॅक केले.