मुंबई : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना देशभरात विविध ठिकाणी प्रत्येकजण हा दिवस आपल्या परिने साजरा करत आहे. देशात आज कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी काही नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. सगल सात वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. आज मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करता येत नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्य जनतेसह अनेक बड्या कलाकारांनी, क्रिडा आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेते अनुपम खेर यांनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 






देशाचा आज ७४वा स्वातंत्र्यदिवस आहे. यावेळी देशाला संबोधित करताना त्यांनी आत्मनिर्भर भारतावर अधिक जोर दिला. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे, असं म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे कल असल्याचं सांगितलं.