मुंबई : नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या 'ड्रीम गर्ल2' ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो. त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात. याविषयी बोलताना आयुषमान खुराना म्हणाला, ''ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2'चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो पुढे सांगतो, "ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.''


बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट असे केले आहेत ज्यातून समाजाल एक मेसेज देता येईल. त्यात अनेक चित्रपट आहेत. दरम्यान, आयुष्मान खुरानाचा एक चित्रपट आहे जो पाहून सगळ्यांना हसू अनावर होतं आणि तो चित्रपट म्हणजे 'ड्रीम गर्ल'. 'ड्रीम गर्ल' या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं होतं. आता सगळ्यांची ड्रीम गर्ल म्हणजेच पूजा आता 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहे.  दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!  


अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच  मुंबईतील मेटा ऑफिसमध्ये लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य म्हणाले की, 'ड्रीम गर्ल 2' 2021 साली येणार होता, पण कोविडमुळे चित्रपट लांबणीवर पडला होता, पण आता 'ड्रीम गर्ल 3' लवकरच सुरू होईल.