Hardeek Joshi and Akshaya Deodhar Engagement Anniversary : छोट्या पडद्यावरील अनेक जोड्या आहेत ज्या लोकप्रिय आहेत. काही जोड्या अशा आहेत ज्या एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठी लोक उस्तुक असतात. तर काही जोड्या एकदा प्रेक्षकांनी स्क्रिनवर पाहिल्या की त्यांची अपेक्षा असते की त्या दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सेटवर प्रेम झाले. आज आपण अशाच एका जोडीविषयी जाणून घेणार आहोत जी फक्त स्क्रिनवर नाही तर खऱ्या आयुष्यातही एकत्र आहेत. त्यांच्या साखरपुड्याला एकवर्ष झाला आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की ही जोडी कोणती आहे तर ती जोडी ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांची आहे. त्या दोघांनी मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आणि आता खऱ्या आयुष्यात एकत्र येत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांच्या साखरपुड्याला 1 वर्ष झाला आहे. त्यानिमित्तानं हार्दिकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांच्या साखरपुड्यातील काही खास क्षण दाखवण्यात आले आहे. त्यांच्या साखरपुड्याला एक वर्ष झाल्यानं हार्दिकनं ही खास पोस्ट शेअर केली होती. या व्हिडीओत अक्षया हार्दिकला अंगठी घालताना दिसत आहे. तसेच हार्दिक अक्षयाला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करत अंगठी घालत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत हार्दिकनं कॅप्शन दिलं की 'माझी जवळची मैत्रीण, माझं प्रेम, तू नेहमीच होतीस, माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. साखरपुड्याच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कधी झाला हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा साखरपुडा?


‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघं कधी लग्न बंधनात अडकतील याविषयी कधीच कोणी विचार केला नव्हता. पण अचानक हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने 3 मे 2022 रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. तर त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. 


हेही वाचा : 'जीन्स काढून घेतल्या अन् ...', बाल्कनीत मुलगा येताच Priyanka Chopra च्या वडीलांनी लागू केले नियम


साखरपुड्याच्या सहा महिन्यांनंतर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरनं 2 डिसेंबर 2022 रोजी सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. इतकंच काय तर त्यानंतर त्या दोघांचे चाहते हे एकमेकांविषयी काय पोस्ट करतात याकडे असते. तर अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर एकमेकांविषयी आणि त्याचसोबत सणांच्या दिवशी शेअर करत असलेले फोटो प्रचंड व्हायरल होतात. त्या दोघांचा मकर संक्रांती स्पेशल, होळी स्पेशल आणि गुढी पाडवा स्पेशल फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते.