Akshaya Deodhar-Hardeek Joshi : संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
Akshaya Deodhar आणि Hardeek Joshi दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. ते जेव्हा मालिकेत होते तेव्हा पासून चाहते त्यांनी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करत होते.
Hardik Joshi-Akshaya Deodhar Once Again On Television: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) सर्वात प्रसिद्ध जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले आहेत. राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Hardik Joshi-Akshaya Deodhar) यांचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिय असलेल्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांना वेड लावलं. आता त्या दोघांच्या जोडीला खऱ्या आयुष्यात रोमान्स करताना नेटकरी पाहत आहेत. दरम्यान, त्या दोघांची केमिस्ट्री ऑनस्क्रिन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले होते. या मालिकेनंतर ते दोघं परत एकदा पडद्यावर दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना होता. इतकच काय तर कधी तरी पुन्हा एकदा हार्दिक आणि अक्षयानं मालिकेत काम करावे अशी इच्छा होती. मालिका संपून आज दोन वर्षे झाली आहेत. तरी सुद्धा आजही मालिकेतील त्यांचे व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी आणि त्यांचे चाहते अजूनही सुंदर कमेंट्स करत असतात. (Hardik Joshi-Akshaya Deodhar Wedding)
अंजली आणि राणा दिसणार पुन्हा एकदा
हार्दिक आणि अक्षया हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र, यावेळी मालिकेसाठी नाही तर झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. यावेळी अक्षया आणि हार्दिकच्या चाहत्यांना त्यांना वेगवेगळे मजेशीर खेळ खेळताना पाहता येणार आहे. हार्दिक आणि अक्षय यांनी हजेरी लावलेला हा एपिसोड 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्तानं दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे. मकर संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये हार्दिक आणि अक्षया यांची जुगलबंदी पाहून नक्कीच त्यांच्या चाहत्यांना आनंद होईल.
हेही वाचा : बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!
'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये हार्दिक आणि अक्षया हे आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तर थोड्याचवेळात ते वेगवेगळे गेम खेळतायत. आदेश बांदेकर हे अक्षयाला एक पैठणी देखील भेट म्हणून देतात.