'हिरोच सिनेमाची हिरोईन ठरवतो'; अभिनेत्रीनं सांगितलं मराठी चित्रपटसृष्टीचं सत्य

लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. संस्कृती बालगुडे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं मराठी चित्रपटसृष्टीतील अशी बाजू सांगितली आहे त्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. 

| Jun 30, 2024, 18:21 PM IST
1/7

संस्कृती बालगुडे हे फक्त एक अभिनेत्री नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. संस्कृतीनं पिंजरा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये देखील दिसली. 

2/7

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला इंडस्ट्रीत आलेल्या अनेक गोष्टी या सांगितल्या आहेत. ही मुलाखत संस्कृतीन 'मित्र म्हणे'ला दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्रींचं कास्टिंग कसं करण्यात येतं. 

3/7

संस्कृती यावेळी म्हणाली, 'एका चित्रपटासाठी माझं कास्टिंग करण्यात आलं होतं. दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टरनं मला फोन करून त्या प्रोजेक्टविषयी सांगितलं.' 

4/7

पुढे संस्कृतीनं सांगितलं की 'त्यानंतर त्यांनी मला फोन करुन सांगितलं, की अभिनेत्यानं सांगितलं की मी दुसऱ्या कास्टिंगचा विचार करेन.' 

5/7

'मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींचं कास्टिंग हे अनेकदा अभिनेतेच करतात. मी फक्त माझ्याबाबतीत म्हणत नाहीये, तर सगळ्या बाबतीत बोलते', असं संस्कृती म्हणाली.   

6/7

पुढे पुरुष वर्चवस्वादी मानसिकतेपुढे आपण काही करु शकत नाही असं सांगत संस्कृती म्हणाली, 'या पुरुष वर्चवस्वादी मानसिकतेपुढे तू काहीच करु शकत नाही, त्यावर तुम्ही डोकंही फोडू शकत नाही. मग तुम्ही त्यावर डोकं का आपटूनही काही होणार नाहीये. ते सोडून तुम्हाला मुव्ह ऑन व्हायलाच हवं.'

7/7

लवकरच ती एका नव्या प्रोजेक्टमधून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तिनं नवीन हेअर कट देखील केला आहे.