Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही सतत चर्चेत आहेत. त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. साखरपुड्याचे फोटो पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. आता ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच त्यांच्या मेहंदी सभारंभाचे फोटो समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक आणि अक्षया दोघेही लवकरच सप्तपदी घेणार असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र, सगळ्यांना प्रश्न होता तो म्हणजे कधी होणार? त्याचा खुलासा आता झाला आहे. त्याचं कारण म्हणजे हार्दिकनं त्याच्या घरी काल केळवण झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. हार्दिकसोबत अक्षयाच्या घरी देखील केळवण झाल्याचे फोटो समोर आले आहेत. अक्षयानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. अक्षयानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. या चॉकलेटी रंगाच्या साडीत अक्षया सुंदर दिसत आहे. अक्षयानं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Date) 



पाहा अक्षयाचे फोटो 



हेही वाचा : 49 वर्षीय Malaika Arora चा बोल्ड लूक पाहून नेटकरी हैराण, ट्रोल करत म्हणाले...


दरम्यान, हार्दिक आणि अक्षया 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. तर ते दोघे पुण्यात जिथे विराजस कुलकर्णी (Virajs Kulkarni)  आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ज्या ठिकाणी लग्नबंधनात अडकले त्याच ठिकाणी हार्दिक आणि अक्षया सप्तपदी घेणार असल्याचे म्हटले जातं आहे. दरम्यान, या बातमीवर हार्दिक आणि अक्षया या दोघांपैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही.