49 वर्षीय Malaika Arora चा बोल्ड लूक पाहून नेटकरी हैराण, ट्रोल करत म्हणाले...

Malaika Arora नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला हा लूक आवडला आहे. 

Updated: Nov 28, 2022, 06:37 PM IST
49 वर्षीय Malaika Arora चा बोल्ड लूक पाहून नेटकरी हैराण, ट्रोल करत म्हणाले... title=

Malaika Arora Troll For Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटात सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून मलायका ही तिच्या Moving In With Malaika या शोमुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकतंच मलायकाचे (An Action Hero) या चित्रपटातील 'आप जैसा कोई' हे गाणं प्रदर्शित झालं असून त्याच्या प्रमोशनमध्ये मलायका व्यस्त आहे. 

या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या मलायकानं काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकानं हिरव्या रंगाचा एक जाळी-दार ड्रेस परिधान केला आहे. मलायकाचा हा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. '#AnActionHero द क्वीन ऑन द डांस फ्लोर, आप जैसा कोई गाणं प्रदर्शित झालं आहे.' (Malaika Arora Social Media Post)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाले नेटकरी 

49 वर्षीय मलायकाचे हे फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, 'मला ती आवडते. पण विनाकारण एवढ्या एक्सपोजरला अर्थ नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अरे व्वा, मच्छरदाणीचा ड्रेस बनवला, याला म्हणतात महागाई.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'स्वतःला जेनिफर लोपेझ समजते.' (Malaika Arora Trolled)

हेही वाचा : 'तो मला विसरला...', Shahid Kapoor ची पत्नी Mira Rajput नं केली धक्कादायक पोस्ट शेअर

मलायकाच्या या नवीन आयटम नंबर 'आप जैसा कोई' (Aap Jaisa Koi) हे गाणं 'कुर्बानी' (Qurbani) चित्रपटातील गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आहे. 'कुर्बानी' चित्रपटातील गाण्यात अमान यांनी डान्स केला होता. हे मूळ गाणं नाझिया हुसैन यांनी गायलं आहे तर नवीन गाणे झहरान एस खान आणि अल्तमश फरीदी यांनी गायले आहे. दरम्यान, मलायका तब्बल 4 वर्षांनंतर 'आप जैसा कोई' मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी ती 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पटाखा' चित्रपटातील 'हॅलो हॅलो' गाण्यात दिसली होता.