मुंबई : भारतातील 21 वर्षाची हरनाज कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी 2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि 1994 मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता.  मिस यूनिवर्सचा मान मिळवल्यानंतर ती अनेक शोमध्ये हजेरी लावते. आता देखील हरनाज  'इंडियाज गॉट टॅलेंट' (India's Got Talent) शोमध्ये उपस्थित होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शोचे परीक्षक  बादशाह (Badshah) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ज्याप्रमाणे शिल्पासोबत वागले, ते हरनाजच्या चाहत्यांना बिलकूल आवडलेलं नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हरनाजने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाहशाहला भेटण्यासाठी जवळ जाते, तेव्हा तो स्वतःच्या खुर्चीत बसून म्हणतो, 'ये कोई तीसरा बंदा आया है चंडीगढ़ से...'


त्यानंतर हरनाज प्रति शिल्पाचे हावभाव चाहत्यांना आवडले नाहीत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हरनाजचा एक चाहता कमेंटमध्ये म्हणाला, 'हरनाजला आदर आणि सन्मान मिळालाचं पाहिजे...'