Sir Michael Gambon Died: 90 च्या दशकातील लोकप्रिय चित्रपट म्हणजे हॅरी पॉटर. हॅरी पॉटर सीरीजच्या प्रत्येक भागांचे भारतात लाखो चाहते आहेत. याच चित्रपटातील प्रोफेसर डंबलडोर ही भूमिका साकारणारे मायकल गँबोन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मायकल गँबोन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायकल गँबेन हे दीर्घकाळापासून आजारी होते. गँबेन यांच्या निधनाबाबत त्यांची पत्नी लेडी गँबन आणि मुलगा फर्गस यांनी एक अधिकृत पत्र जारी केले आहेत. त्यात त्यांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, मायकल गँबेन यांचा दुखःद मृत्यू झाला आहे. मायकल हे खूप चांगले पती व आदर्श पिता होते. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत असून निमोनियानेग्रस्त होते. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा काळ आमच्यासाठी खूप दुखः असून आम्हाला काही दिवस एकट राहायचं आहे त्यामुळं आम्हाला थोडा एकांत देण्यात यावा, अशी विनंती या पत्रातून मायकल गँबेन यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. 


मायकल गँबेन यांना प्रेमाने द ग्रेट गँबेन या नावाने ओळखलं जात होतं. अभिनेता राल्फ रिचर्डसन यांनी त्यांना हे नाव दिलं होतं. हॉलिवूड चित्रपटात काम करण्यांपूर्वी ते नाटकांत काम करत होते. नाटकात काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 15 वर्षांचे असतानाच मायकल यांनी शाळा सोडली होती. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात ते छोट्या प्रोडक्शन हाउसमध्ये काम करत होते. तिथेूनच त्यांनी अभिनय शिकला कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 


1989 मध्ये त्यांनी द कुक, द थीफ, हिज वाइफ अँड हर लव्हर या चित्रपटात काम केले होते. त्याव्यतिरिक्त त्यांनी द सिंगिंग डिटेक्टिव्ह आणि एंजल्स इन अमेरिका याचित्रपटातही काम केले होते. मात्र, 2004मध्ये आलेल्या हॅरी पॉटरमुळं जे जगभरात प्रसिद्धीस आले. हॅरी पॉटरमध्ये त्यांनी प्रोफेसर डंबलडोर ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना सगळेच डंबलडोर नावानेच ओळखू लागले. त्यांचा शेवटचा चित्रपट 2019 मध्ये कॉर्डेलिया हा होता. मायकल गँबेन यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे