हर्षालीने तिच्या नवीन लूकमध्ये शॉर्ट स्कर्ट, हाय नेक स्वेटर आणि सुंदर हेअर स्टाइलमध्ये व्हिडीओ शूट केला. तिच्या लूकमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आहे. या लूकमध्ये ती वेगवेगळ्या पोझेस देताना दिसत आहे. हर्षाली मोठी झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अद्याप कायम आहे आणि तिच्या या नवा लूकमुळे तिच्या चाहत्यांना 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आठवली. हर्षालीच्या या नवा अवताराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत आणि तिचे सौंदर्य आणि स्टाइल चर्चेचा विषय बनले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया
हर्षालीच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, 'तु देवाने पाठवलेला देवदूत असल्यासारखे सौंदर्य आहेस.'  दुसऱ्या नेटकऱ्याने तिच्यासाठी शायरी लिहिली, 'तुझ्या सौंदर्याला उत्तर नाही, शब्दात व्यक्त करणं सोपं नाही. तुझ्या सौंदर्याची स्तुती करण्याचे धाडस माझ्यात दिसत नाही, तू असा गुलाब आहेस जो प्रत्येक बागेत फुलत नाही.' काही चाहत्यांनी हर्षालीला 'गोंडस' असेही म्हटले आहे. तिच्या सौंदर्याचं आणि तिच्या लूकचं ते खूप कौतुक करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हर्षालीचे शालेय जीवन
सध्या हर्षाली कॉलेजमध्ये शिकत आहे. ती अकरावीत आहे आणि यावर्षी बारावीमध्ये प्रवेश घेणार आहे. 2024 मध्ये तिच्या 10वीच्या मार्क्समुळे देखील मोठा चर्चेचा विषय बनला होता. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना हर्षालीने सांगितले होते की, तिला 10वीमध्ये 83% गुण मिळाले आहेत. 


हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/ranbir-kapoor-and-alia-bhatt-celebrated-new-year-with-their-family-at-thailand/874309


वर्क फ्रंट
'बजरंगी भाईजान'नंतर हर्षालीने काही टिव्ही शोजमध्येही काम केले आहे. ती टिव्ही शो 'कुबूल है' आणि 'लौट आओ तृषा'मध्ये दिसली होती. त्याशिवाय, हर्षाली 'क्राइम पेट्रोल'च्या भागातही दिसली होती. तिच्या अभिनयाचे कौतुक अजूनही होत असले तरी, ती शालेय जीवनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे आणि भविष्यामध्ये आणखी मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसण्याची तिची इच्छा आहे.


हर्षालीच्या या नवीन लूकने आणि व्हिडीओने तिच्या चाहत्यांना एकदम मोहित केले आहे. तिच्या सुद्धा मोठ्या अभिनेत्री होण्याची क्षमता आहे आणि तिच्या वाढत्या यशाच्या प्रवासाला अजून बरेच मोठे टर्निंग पॉइंट्स येऊ शकतात.