मुंबई : बहुविध माध्यमांच्या उपलब्धतेमुळे अनेक कलाकार हे त्यांच्या प्रांत आणि भाषेपुरता मर्यादित न राहता त्यांची कला देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. अशा कलाकारांमध्ये येणारं आणि विशेषत: हरियाणवी संगीत, कलेला मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवणारं एक नाव म्हणजे गायिका, डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपनाच्या लोकप्रियतेविषयी आणि तिच्या कलेविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. पण, आता मात्र ज्याप्रमाणे काळ बदलत आहे, त्याचप्रमाणे ओघाओघानं काही नवी नावं सपनाच्या प्रसिद्धीला झाकोळण्याचं काम करताना दिसत आहेत. 


फक्त नवी नावं नव्हे, तर निर्माते- दिग्दर्शकांच्या नव्या मागण्या आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या साऱ्यामध्ये सपना मात्र बरीच मागे पडताना दिसत आहे. 


एक काळ गाजवणारी आणि धमाकेदार परफॉर्मन्स देणारी हीच सपना आता मोठ्या संकटात आहे. एका मुलाखतीत तिनं या दु:खाला वाचा फोडली. 


काय आहे तिच्या या परिस्थितीचं कारण? 


एका मुलाखतीत सपना मनमोकळेपणानं बोलली आणि तिच्या मनात असणाऱ्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 


लवकरच आपल्याला या कला जगतामध्ये काम करत असताना 15 वर्षे पूर्ण होणार आहेत.


आता हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणारी सपना आपल्याला आपली कला योग्य पद्धतीनं दाखवण्याची संधी मिळाली नसल्याचं मुलाखतीत म्हणाली. 


आपण असे कपडे घालू शकत नाही, जिथं शरीर दिसेल. मला तर इंग्रजीही बोलता येत नाही, याच गोष्टी आता माझ्यापुढे अडचणी निर्माण करत असल्याचं सपना म्हणाली. 


लोकं फक्त गरज पाहतात... 


मुंबईबाबतचा सपनाचा अनुभव फारसा चांगला नाही. जी मुंबई अनेकांची स्वप्न पूर्ण करते तिथंच सपनाला मात्र चांगली वागणूक मिळाली नाही. अनेकदा कामापूरताच तिच्याशी संपर्क साधला गेला. 


तिच्याबाबत पूर्वग्रह बांधले गेले. अनेकदा चित्रीकरणादरम्यान, डिझायनर कपडेही तिला मिळाले नाहीत. आज आपण जे काही आहोत ते फक्त आपल्या परफॉर्मन्सच्या बळावरच असल्याचं तिनं सांगितलं. 



काही नवं करण्याच्या शोधात असणारी सपना या कलाजगतामध्ये आपलं अस्तित्वं कुठवर आहे ही वस्तुस्थिती नाकारत नाही.


तरीही आता ती नव्या कामाच्या शोधात आहे. आपण नव्या कामासाठी आशावादी असल्याचं ती या मुलाखतीत न विसरता म्हणाली.