महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...

| Oct 01, 2024, 14:49 PM IST
1/10

sambhajirajechhatrapati

विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नवीन पक्षाची एन्ट्री झाली असून यावर निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केलं आहे. याच पक्षाबद्दल जाणून घेऊयात...

2/10

sambhajirajechhatrapati

राज्यसभेचे माजी खासदार आणि सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या संभाजी राजे यांनी आपल्या समर्थकांना एक गुड न्यूज दिली आहे. 

3/10

sambhajirajechhatrapati

9 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे, अशी माहिती संभाजी राजेंनी दिली आहे. 

4/10

sambhajirajechhatrapati

'स्वराज्य' संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, असं म्हणत संभाजी राजेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन पक्षाची एन्ट्री होत असल्याचं जाहीर केलं आहे. 

5/10

sambhajirajechhatrapati

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी राजेंच्या या नव्या पक्षाला निवडणूक चिन्हही मिळालं आहे. 

6/10

sambhajirajechhatrapati

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे, असं संभाजी राजेंनी म्हटलं आहे.

7/10

sambhajirajechhatrapati

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे, असं आवाहन संभाजी राजेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 

8/10

sambhajirajechhatrapati

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता आपला पक्ष भरुन काढेल असा विश्वासही संभाजी राजेंनी व्यक्त केला आहे.  

9/10

sambhajirajechhatrapati

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित, असा विश्वास संभाजी राजेंनी व्यक्त केला आहे. 

10/10

sambhajirajechhatrapati

संभाजी राजेंच्या या स्वराज्य संघटनेनं यापूर्वीच परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी असल्याचं जाहीर केलं आहे. "सोडा परंपरागत पक्षांची भक्ती, आता निवडू परिवर्तन महाशक्ती," असं म्हणत संभाजी राजेंनी काही दिवसांपूर्वीच या तिसऱ्या आघाडीच्या मेळाव्याची क्षणचित्रे शेअर केली होती. संभाजी राजेंबरोबरच प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंचा पक्ष या तिसऱ्या आघाडीत सहभागी आहे.