चंदीगड : लवकरच बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम नवीन सीझनसहीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. यंदाही अभिनेता सलमान खाननं या कार्यक्रमाचं यजमानपद स्वीकारलंय... यंदा या कार्यक्रमात एक सामान्यांनाही एन्ट्री देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणामधली एका सामान्य कुटुंबातली आणि आपल्या उपजीविकेसाठी नाचून-गाऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारी सपना चौधरी हीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हरियाणात सपनावर घायाळ होणारे अनेक 'फॅन्स' असले तरी एक सामान्य व्यक्ती म्हणूनच ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.



कोण आहे सपना?


'बिग बॉस' अर्थातच 'कन्ट्रोव्हर्सी'... सपनादेखील याला अपवाद ठरेल असं काही दिसत नाहीय... ५ सप्टेंबर १९९० मध्ये जन्मलेली सपना मूळची हरियाणाच्या रोहतकची... तिचं जुजबी शिक्षण रोहतकमध्येच झालंय... तिचे वडील रोहतकमधल्याच एका खाजगी संस्थेत काम करत होते. २००२ मध्ये तिच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी १२ वर्षांच्या सपनाच्या खांद्यावर येऊन पडली.


सपनाला नाचण्या-गाण्याची हौस... आणि हाच तिचा छंद तिच्या उदरनिर्वाहाचं साधन बनला... दिल्ली आणि हरियाणामध्ये तीनं स्टेजवर आपल्या नाचण्या-गाण्यानं आपले अनेक फॅन्स मिळवलेत. रागिनी गायकी आणि डान्ससाठी अनेक जण तिला ओळखतात... तिचं 'सॉलिड बॉडी रे' हे गाणं हरियाणात भलतंच फेमस झालंय. उल्लेखनीय म्हणजे सपना आपला परफॉर्मन्स सलवार - कुर्त्यातच सादर करते...