मुंबई : शुक्रवारची सकाळ चाहत्यांसाठी खास होती. कारण प्रियंका चोप्राच्या साखरपुड्याची बातमी समोर आली. प्रियंका चोप्राने 18 जुलै रोजी बॉयफ्रेंड निक जोनससोबत साखरपुडा केला. मात्र याची कुणालाही कानोकान खबर लागली नाही. आणि अगदी दिवस सरता सरता आणखी एका अभिनेत्रीच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील अगदी गपचुप साखरपुडा केला आहे. डेनमार्क बॅडमिंटन खेळाडू Mathias Bao सोबत साखरपुडा केला आहे. एवढंच नाही, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून तापसीचे आई-वडिल गोव्यात होते. तिथे या दोघांच लग्न नक्की झालं. मात्र आता या अभिनेत्रीने यावरचं मौन सोडलं आहे. 



तापसी पन्नूने ट्विटरवर त्या वेबसाइटला खडे बोल लगावले आहेत. तिने म्हटलं की, खरंच, आश्चर्य आहे की, मला माझ्याच साखरपुड्यात बोलवण्यात आलं नाही. तसेच तापसीने सांगितलं की, माझे आई - वडिल गेल्यावर्षी गोव्यात गेले नव्हते. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की, 10 वर्षापूर्वीच माझा साखरपुडा झालेला नाही. 



तापसी पन्नू लवकरच 'मुल्क' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये ती वकिलच्या भूमिकेत दिसत आहे. त्यानंतर सप्टेंबर 'मनमर्जिया' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात ती विक्की कौशल आणि अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. हल्लीच तिचा 'सुरमा' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमी कमाई करू शकला.