Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar on Mumbai Police :  महाराष्ट्राची क्रश म्हणून प्रियदर्शनी इंदलकर ही मराठमोळी अभिनेत्री चर्चेत असते. प्रियदर्शनीचे लाखो चाहते आहेत. प्रियदर्शनीनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात जागा केली. प्रियदर्शनी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रियदर्शनीला मुंबई पोलिसांचा असा काही अनुभव आला त्याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियदर्शनीनं इंदलकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून याविषयी सांगितलं आहे. प्रियदर्शनीनं शेअर केलेल्या या व्हिडीओत संपूर्ण किस्सा सांगितला आहे. "मी मुंबईत आहे. सिग्नल व्यवस्थित पाळून सिग्नल क्रास करून पुढे गेल्यावर पोलिसांनी मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि मग काय मी फार घाबरले. त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ होता. पुढे पोलिसांनी मला काच खाली करायला सांगितली. त्यानंतर ते म्हणाले की आज महिला दिन आहे. त्यामुळं आम्ही ज्या फिमेल ड्रायव्हर आहेत त्यांना फुल देऊन त्यांच्या गाडीसोबत एक फोटो काढतोय. पुढे त्यांनी मला फुल दिलं. हे सगळ्यात भारी होतं. मुंबई पोलिसांचे आभार", असं प्रियदर्शनी म्हणाली.



त्यानंतर प्रियदर्शनीनं मुंबई पोलिसांचा एक फोटो शेअर केला आहे. "किती गोड आहे ते खरंतर पोलिसांची भिती वाटण्याचं काही कारण नाहीय जोवर तुम्ही काही चुकीचं करत नाही", असं कॅप्शन प्रियदर्शनीनं दिलं आहे.  त्यानंतर प्रियदर्शनीनं तिचा पोलिसांनी दिलेलं फूल हातात धरल्याचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, प्रियदर्शनीनं शेअर केलेली ही पोस्ट नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांचे देखील कौतुक करण्यात येत आहे.



हेही वाचा : 'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार 


प्रियदर्शनीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमातून ओळख मिळाली.  याशिवाय प्रियदर्शनी ही 'फुलराणी', 'नवरदेव' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. प्रियदर्शनीचे इन्स्टाग्रामवर 253K फॉलोवर्स आहेत.