नवी दिल्ली : उर्वशी रौतेलाच्या हेट स्टोरी 4 या चित्रपटाचे नवीन गाणे 'बूंद-बूंद' आज प्रदर्शित झाले. या रोमांटीक गाण्यात उर्वशी रौतेला आणि अभिनेता विवान दिसत आहेत. हे गाणे गायक जुबिन नोटियाल आणि नीति मोहन यांनी गायले आहे. तर अरको ने या चित्रपटाला संगीत दिले आहे. मनजोत मुंतसर आणि संजय गुप्‍ता हे या गाण्याचे गीतकार आहेत. गाण्यात उर्वशी आणि विवान थिरकताना दिसत आहेत.


चित्रपटाचे नवे गाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या ट्रेलर काहीसा बोल्ड होता. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पंड्या याने केले आहे. चित्रपटात उर्वशी आणि विवान व्यतिरिक्त पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन देखील आहे. पहा चित्रपटाचे नवे गाणे...



असा आहे चित्रपट


हेट स्टोरी 4 मध्ये उर्वशी एका मॉडलची भूमिका साकारत आहे आणि करण फोटोग्राफरच्या भूमिकेत आहे. करण आणि उर्वशी एकमेकांच्या प्रेमात असतात मात्र विवान उर्वशीच्या प्रेमात पडतो. यानंतर दोघांत प्रेमावरून वाद होऊ लागतात. चित्रपटात गुलशन ग्रोवर, करण वाही आणि विवान यांच्या वडीलांची भूमिका साकारत आहेत.


९ मार्चला होणार प्रदर्शित


हा हेट स्टोरी सीरीजचा चौथा चित्रपट असून पूर्वीचे सर्व चित्रपट हिट होते. त्यामुळे हा चौथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल, हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट ९ मार्चला प्रदर्शित होईल.