मुंबई :  मुंबईतच राहून मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी'. अरुण गवळी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता 'दगडी चाळ 2' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आगामी सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरतो, की नाही... हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. 
 
बॉलिवूडमध्ये अनेक डॉनच्या जीवनावर फिल्म काढण्यात आले आहेच. आता मराठीत डॉन अरुण गवळी याच्यावर हा सिनेमा काढण्यात आला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तुफान गल्ला जमवल्यानंतर 'दगडी चाळ 2' 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे 'दगडी चाळ 2' सिनेमाच्या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. आता 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना नक्की कोण-कोणता थरार अनुभवता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी  'दगळी चाळ' सिनेमाच्या यशानंतर 'दगडी चाळ 2' सिनेमाची घोषणा केली आहे. 


''आज आम्हाला 'दगडी चाळ 2'च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. 'दगडी चाळ'ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला.' असं मत संगीता अहिर यांनी व्यक्त केलं आहे.