Heeramandi Screening: संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी या वेबसीरीजची सध्या सगळीकडे चर्चा आहे. हिरामंडीच्या माध्यमातून भन्साळींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. हिरामंडीच्या कलाकारांबरोबरच चित्रपटाचा सेट व त्यांच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. हिरामंडीमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, संजिंदा शेख, रिचा चड्ढा, शर्मिनी सेगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. वेबसिरीज रिलीज झाल्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोदन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिरामंडीच्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यावरुन नेटकऱ्यांनी संजय लीला भन्साळी आणि शर्मिनी सेगल यांना ट्रोल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरामंडीच्या संपूर्ण स्टारकास्टच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. मात्र, नेटकऱ्यांना संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिली सेगल हिचा अभिनय मात्र प्रेक्षकांना खटकला आहे. सोशल मीडियावर तिच्या अभिनयावरुन ट्रोल केले जात आहे. भन्साळीची भाची असल्यामुळंच तिला इतकी चांगली भूमिका मिळाली मात्र ती या भूमिकेला न्याय देऊ शकली नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. त्यातच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत शर्मिनी सेगलमुळं रिचा चड्ढा हिचा अपमान झाल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.


हिरामंडीच्या प्रदर्शनानंतर संपूर्ण स्टारकास्ट एका कार्यक्रमात दिसून आली होती. यावेळी संपूर्ण स्टारकास्ट फोटो साठी एकत्र उभी होती. त्याचवेळी रिचा चड्ढा तिथून जात असताना तिला पुन्हा फोटोसाठी उभं राहण्यास सांगितले. रिचा चड्ढा फोटोसाठी संजय लीला भन्साळी यांच्या बाजूला उभी राहण्यासाठी आली तेव्हा शर्मिनी सेगल आणि भन्साळी यांनी तिला बाजूला उभं राहण्यास सांगितले. रिचा चड्ढा हिला मधूनच बाजूला करुन भन्साळी यांनी त्यांची भाची शर्मिनी हिला मध्ये उभं केलं. या प्रकारानंतर रिचा हिचा चेहरादेखील पडला असल्याने नेटकऱ्यांनी हेरलं. रिचा चड्ढा हिच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलले होते. त्यामुळं काही सेकंदासाठी एक ऑकवर्डपणा आला होता. 


व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी शर्मिनी सेगल हिला टार्गेट केले आहे. तर, अनेकांना तिचे हे वागणं खटकलं आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी संजय लीला भन्साळी यांना सुनावलं आहे. रिचाला बाजूला करुन स्वतःच्या भाचीला पुढं करणे हे खूप लज्जास्पद आहे, असं एकाने म्हटलं आहे. खरं तर शर्मिनी थोडी बाजूला झाली असती तर रिचाला भन्साळींच्या बाजूला उभी राहू शकली असती. मात्र तिने रिचाला बाजूला केले त्यामुळं परिस्थिती थोडी ऑकवर्ड झाली. असंही एकाने कमेंट करत म्हटलं आहे.