'जाने तू या जाने ना' फेम इम्रान खान झाला कर्जतकर! त्याच्या आलिशान बंगल्याचे Photos पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता इमरान खान मोठ्या पडद्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून लांब होता. तरी सोशल मीडियच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात रहायचा. आता त्याचं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याचा नवीन आलिशान व्हिला... त्याचे इन्साईड फोटो समोर आले आहेत. 

| Jun 02, 2024, 15:42 PM IST
1/7

इमरान खान

इमराननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्याशिवायनं त्यानं स्वत: हे घर डिझाइन केल्याचं त्यानं सांगितलंय. 

2/7

असं सुरु झालं बांधकाम!

इमराननं कॅप्शनमध्ये सांगितलं की त्याला ही जागा खूप आवडली. इथे निर्सगाला अनुभवता येतं पण इथे व्हिला कसा बांधायचा यासाठी त्यानं जवळपास 1 वर्ष या जागेची पाहणी केली.   

3/7

निसर्गाविषयी बोलताना म्हणाला...

इमरान म्हणाला, 'माझे प्रयत्न हे एक आलिशान हॉलिडे व्हिला बनवनं नव्हतं, तर असं काही बनवायचं होतं जे लॅन्डस्केपनं प्रेरित असेल. घराचा अर्थ फक्त व्ह्यू असनं नाही, हे एक आश्रम आहे जिथून तुम्ही निसर्गाचं सौंदर्या पाहून त्याची स्तुती करू शकता.' 

4/7

गावांमधल्या घरांप्रमाणे केलं बांधकाम

गावांमध्ये घरे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लासिक पद्धतीचा अवलंब केला. पायासाठी दगडी प्लिंथ, एकमजली विटांच्या भिंती, स्टीलच्या छतासाठी बीम आणि प्री-फॅब्रिकेटेड इन्सुलेटेड छतावरील शीट. बस एवढेच.'

5/7

किती आला खर्च?

'ज्या व्हिलांच्या मी जाहिरात पाहतो, जे व्हिला आधीपासून तयार असतात त्या व्हिलाच्या तुलनेत मला खूप कमी पैसे लागले. तर मला आश्चर्य होतंय की मार्कअप कुठे जातंय?', असं इमराननं सांगितल. 

6/7

कुठे आहे व्हिला?

इमराननं एका नेटकऱ्यांनी हा व्हिला कुठे आहे असं कमेंट सेक्शनमध्ये विचारल्यानंतर त्यानं हे कर्जतल्या असल्याचं सांगितलं. 

7/7

सुंदर आणि एलिगेन्ट इन्टेरियर

इमरानच्या या घराला मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. जिथून निसर्गाचा व्हिलाच्या आत असताना देखील आनंद घेऊ शकतो. (All Photo Credit : Imran Khan Instagram)