Sonakshi Sinha on Heeramandi Foreplay Scene : नुकत्याच 1 मे रोजी संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची हीरामंडी ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये असलेल्या सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha) अशा एका मुलीची भूमिका साकारली आहे, जी पुरुषांचा तिरस्कार करते. या सीरिजमध्ये असलेल्या सोनाक्षीच्या भूमिकेचं नाव फरीदन आहे. तर तिनं या सीरिजमध्ये आधी मदतनीससोबत आधी फोरप्ले केलं मग सेक्स सीन्स दिले. इतकंच नाही तर उस्तादजी यांच्यासोबतही इंटीमेट सीन दिला. या सगळ्या गोष्टींवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीनं ही मुलाखत 'न्यूज 18 शोशा'ला दिली होती. या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की सुरुवातीला भन्साळी सरांनी सांगितलं होतं की 'फरीदन खूप फ्लूइड म्हणजे (जी फक्त एकाच जेंडरमध्ये अडकून राहत नाही) त्यावेळी खूप काही झालं होतं. हीरामंडी सारख्या ठिकाणी लोक खूप ओपनअप झाले होते. इतकंच नाही तर उस्तादजी देखील गे होते, जे सगळ्यांना माहित होतं. सरांना या सगळ्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीनं एक्सप्लोर करायचं होतं. फरीदनच्या आयुष्यात जे काही घडलं त्याचा देखील तिच्यावर परिणाम झाला होता.' 



सीरीजमध्ये एक सीन आहे ज्यात फरीदन तिच्या मदतनीससोबत फोरप्ले करते, तेच पुढे जाऊन सेक्स सीनमध्ये जाण्याची एक हिंट देत असतं. त्यावर बोलताना सोनाक्षी म्हणाला की, 'ज्यावेळी तिला विकण्यात आलं होतं, तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती. त्यामुळे अशी शक्यता आहे की कोणत्याही पुरुषाचा ती तिरस्कार करण्याचं हेच कारण असू शकतं. त्यामुळेच तिला इतक्या मोकळ्या विचारांची दाखवण्यात आली. त्यांनी त्याला इतकं एक्सप्लोर केलं नाही, एक सीनमध्ये जिथे चौधरी साहेबला ती भेटते आणि नंतर त्यांच्या मदतनीससोबत फोरप्ले करते. हे खूप मोठं जग आहे आणि सरांनी त्याचे वेगवेगळ्या भागांना हळूच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.'


हेही वाचा : फ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक


सोनाक्षीनं सांगितलं की 'एक कॉस्ट्यूम त्यांना इतका आवडला की संजय लीला भन्साळी यांच्याकडून तिनं तो मागितला. सोनाक्षीनं सांगितलं की तिलस्मी बाहें या गाण्यातील आऊटफिट माझा आवडता आऊटफिट होता. मी तो ठेवून घेतला. मी स्वत: ला सांगितलं की मला हे पाहिजे. मी सरांकडे विनंती केली की मी हा ड्रेस ठेवू शकते का? गाणं खूप स्पेशल ठरलं आहे. त्याच्या आठवणी इतक्या आहेत की शूटचा दिवस आयुष्यभर आठवण ठेवेन.'