फ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक

Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा... 

दिक्षा पाटील | Updated: May 9, 2024, 04:34 PM IST
फ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक title=
(Photo Credit : Social Media)

Prasad Oak Dog Birthday Viral Video:  : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते दोघे त्यांच्या श्वानासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच त्याचा पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस साजरा केला आहे. तो देखील हटके अंदाजात... 

मंजिरी ओकनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजिरीनं मस्कराला गुलाबी फ्रॉक परिधान केला आहे. त्याशिवाय तिला गुलाबी रंगाची टिकली, गुलाब आणि दोन पोनी घातल्या आहेत. तर तिच्या गळ्यात मोत्याची माळ घातली आहे. खरंतर मक्सराच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर या व्हिडीओमध्ये मस्कराना चालताना दिसते. कधी पोज देताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत मंजिरी ओकनं कॅप्शन दिलं आहे की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मस्कुडी... देवाचा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी राहो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर मंजिरीनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांनी देखील हटके कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'किती ते गोड, वाढदिवसाच्या शुभेच्छा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मस्कारा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अगं बाई... किती ते गोड... मला देना ती.' तर अभिनेत्री अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली, 'अरे व्वा.... माझ्या क्युटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा... अम्मू मावशी लव्ह्स यू.' स्वप्नील जोशीनं कमेंट करत लिहिले की 'खूप क्यूट! वाढदिवसाच्या शुभेच्छा.' तर लोकप्रिय लेखिका मधुगंधा कुलकर्णीनं 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मस्कारा' असं म्हटलं आहे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी मस्काराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : पाकिस्तानपर्यंत धूम ठोकणाऱ्या 'गुलाबी साडी'चं भोजपुरी व्हर्जन आलं, ऐकलंय का?

'गुलाबी साडी' या गाण्याविषयी बोलायचं झालं तर या गाण्याचं वेड आता सगळ्यांनाच लागंलय असं म्हणायला हरकत नाही. 'स्पॉटीफाय'च्या जागतिक व्हायरल गाण्यांच्या लीस्टमध्ये 'गुलाबी साडी' या गाण्यानं स्वत: चे स्थान निर्माण केले आहे. या गाण्याचं आता भोजपुरी व्हर्जन देखील समोर आलं आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून पाकिस्तानमध्ये देखील या गाण्याची भुरळ सगळ्यांना पडली आहे. संजू राठोडनं हे गाणं गायलं आहे. त्यांच्या इतर काही गाजलेल्या गाण्यांपैकी एक गुलाबी साडी आहे.