मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने तिचं आत्मचरित्र लॉन्च केलंय. ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकातून पडद्यामागील हेमाबद्दल लिहिलं गेलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनी यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा या पुस्तकातून होणार आहे. यात काही चांगल्या तर काही वाईट घटनांचाही उल्लेख असेल. 


पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, या पुस्तकात सनी आणि बॉबी यांच्याबद्दल काय असेल? तर त्या म्हणाल्या की, पुस्तकाचं नाव बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ असं आहे. यात एक अभिनेत्री नाहीये. एक व्यक्ती म्हणून माझ्या जीवनातील गोष्टी आहेत. सनी आणि बॉबी माझ्या जीवनाचा भाग आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलही या पुस्तकात बरंचकाही असेल’.


यावेळी सनीसोबतचं नातं कसं आहे यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘माझा अपघात झाला होता तेव्हा सर्वात पहिले सनी मला पाहण्यासाठी आला होता. सनी आणि माझ्यात खूप सुंदर आणि सौहार्दपूर्ण नातं आहे. जेव्हाही गरज पडते तो येतो. माझा अपघात झाल्यावर त्याने माझ्या उपचारासाठी सगळी व्यवस्था केली होती. ज्याप्रकारे त्याने माझ्या तब्येतीची काळजी घेतली ते पाहून मी खूप खुश होते’.