मुंबई : गेले अनेक वर्ष अभिनेत्री हेमा मालिनी सिनेसृष्टीपासून लांब आहेत. मात्र नुकतीच त्यांनी पुन्हा एकदा सिनेमात परतण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.  नुकतंच हेमा यांनी चित्रपट करण्याची त्यांची आवड दाखवली असून मला चित्रपट करायला आवडेल असं सांगितलं आहे. मला संधी मिळाली तर मला चित्रपट करायला नक्कीच आवडेल.  आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीचं तिच्या फिल्मी करिअरबद्दल काय म्हणणं आहे. या बद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी चित्रपटांपासून दुरावल्या आहेत आणि आता बऱ्याच काळापासून हेमा मालिनी राजकारणातही सक्रिय झाल्या आहेत. हेमा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कायम चर्चेत असतात.  आता नुकतीच हेमा यांनी चित्रपट करण्याची तिची आवड दाखवली असून मला चित्रपट करायला आवडेल असं सांगितलं आहे. मला संधी मिळाली तर मला चित्रपट करायला नक्कीच आवडेल.  


बऱ्याच काळानंतर शर्मिला टागोर, जया बच्चन आणि पती धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केल्यानंतर, अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या की, तिलाही चित्रपट करायला आवडेल. जर निर्माते तिच्यासाठी काही चांगल्या भूमिका घेऊन आले तर मला नक्कीच पुनरागमन करायला आवडेल. हेमा शिमला मिर्ची या सिनेमात शेवटच्या दिसल्या होत्या, जो २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. 2000 च्या दशकात, अभिनेत्रीने बागबान, वीर-जारा, बाबुल आणि बुढा होगा तेरा बाप यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यानंतर त्या इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाल्या.


नुकतंच एका मुलाखतीत हेमा यांनी तिच्या फिल्मी करिअरबद्दल वक्तव्य करत म्हटलं की, 'मला चित्रपट करायला आवडेल. मला काही चांगल्या भूमिका मिळाल्या तर मी नक्कीच चित्रपट करेन आणि का नाही? शेवटी मी देखील एक अभिनेत्री आहे. सर्व निर्मात्यांनी पुढे येऊन मला साइन करावं असं मला वाटतं. मी तिथेच आहे फक्त तुम्ही लोकं माझ्याकडे येण्याची वाट पाहत आहे.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं नाही
पुढे मुलाखतीत हेमाला विचारण्यात आलं की, तिने आपल्या सहकाऱ्यांना पाहून हा निर्णय घेतला आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली की, माझी इच्छा होती की, मी 'बागबान' नंतर आणखी त्यांच्यासोबत काम करावं.  'बागबाननंतर आम्ही आणखी अनेक चित्रपट एकत्र केले असते असं मला वाटलं होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. कदाचित लोकांना फक्त 'बागबान'च आठवत असेल. बच्चनजींसोबत काम करणं खूप छान अनुभव होता.