Hemangi Kavi : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडत असतात. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi). आपल्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीनं चाहत्यांचं मनोरंजन करणारी हेमांगी पुन्हा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ( hemangi kavi latest video) आता हेमांगीने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमांगी कवी ही फेसबुकवर कायमच विविध गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिचे काही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत हेमांगीने कॅप्शनमध्ये, 'शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी, दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी, वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा, तू असा जवळी रहा – मंगेश पाडगावकर' असं लिहिलं आहे. (hemangi kavi viral photo)



अभिनत्रीच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने फोटोंवर कमेंट करत 'अप्रतिम शुभांगी' असं लिहिलं आहे. कमेंट करत नेटकऱ्याने हेमांगीचं नाव चुकवल्यामुळे हेमांगी भडकली आणि तिने त्याला उत्तर देखील दिलं. (hemangi kavi viral video)



यावर कमेंट करत हेमांगी म्हणाली, 'नाव समोर असतानाही कसं काय चुकू शकतं?' सध्या हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (hemangi kavi interview)


हेमांगी कायम स्वतःला खटकलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींवर स्वतःचं मत मांडत असते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण ट्रोल (hemangi kavi troll) करणाऱ्यांना हेमांगी फारसं महत्त्व देत नाही.