मुंबई :  जुनी नाटकं पुन्हा नव्या स्वरूपात रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी सुनील बर्वे यांनी 'सुबक' या संसथेद्वारे 'हर्बेरियम' हा उपक्रम हाती घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच 'हर्बेरियम' च्या दुसर्‍या पर्वाची सुरूवात होणार असल्याची माहिती सुनील बर्वे यांनी दिली आहे. 


ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले गं काठेवाडी’या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी अशी कलाकार मंडळी या नाटकातून रसिकांसमोर येणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात संध्याकाळी ४ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होईल. 


 ‘पती गेले गं काठेवाडी’या नाटकांसोबतच विजय केंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे हे  दिग्दर्शक अन्य नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. महाराष्ट्रभरात या नाटकाचे प्रत्येकी  २५ प्रयोग रंगणार आहेत.